Published On : Tue, Jun 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नंदुरबारमध्ये भाजपला धक्का; काँगेसचे गोवाल पाडवी विजयी तर हीना गावितांचा पराभव

Advertisement

नंदुरबार: लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे . यातच राज्यातील पहिला लोकसभा मतदारसंघ असलेल्या नंदुरबार मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे.

नंदुरबारमध्ये भाजपाच्या डॉ. हिना गावित आणि काँग्रेसचे ॲड.गोवाल पाडवी यांच्यात अटीतटीची सामना पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकांमध्ये हायव्होल्टेज मतदारसंघ म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघ गणला गेला.

अशात या लोकसभा क्षेत्रात कोण विजय होईल याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले होते.

आता चित्र स्पष्ट झाले असून इथे काँगेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. काँगेसच्या विजयानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. दोन टर्मपासून खासदार असलेल्या डॉ हिना गाविता यांचा पाडवी यांनी पराभव केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.