Published On : Sat, Jul 4th, 2020

पूर्व नागपुरात भा.ज.प.चे 276 बुथवर वाढीव वीज बिलाविरुद्ध आंदोलन

Advertisement

नागपूर : पूर्व नागपुरात 276 बुथवर म्हणजे अगदी गल्ली-नुक्कड व चौकावर वीज बिल विरोधी फलक घेऊन भा.ज.प. च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यापूर्वी सुद्धा भा.ज.प. चे शहर स्तरावर, नंतर मंडळ स्तरावर आणि आता बूथस्तरावर भा.ज.प. कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. आताही या महाराष्ट्र सरकारला लाज वाटली नाही तर अगदी घरा-घरातून आन्दोलन करण्यात येईल. असा इशारा आमदार कृष्णा खोपडे यांनी महाराष्ट्र सरकारला दिला.

आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, मागील काळात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रेरणा घेत त्यांनी 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली होती, मात्र घोषणा करताना ते विसरले कि सरकार कॉंग्रेसची नसून तिकडी सरकार आहे. वरून दबाव येताच त्यांनी लगेच यु-टर्न घेत मोफत वीजेची घोषणा मागे घेतली. आज खरच ही घोषणा अमलात आणण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा दिलेला शब्द पाळावा. उर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र देऊन एप्रिल– मे – जून या तीन महिन्याचे बिल माफ करण्याची मागणी केली होती. मात्र उर्जामंत्री यांनी पत्राचे साधे उत्तर देखील दिले नाही.

आमदार कृष्णा खोपडे पुढे म्हणाले कि, कोरोनाच्या महामारीत कुणाला दुप्पट तर कुणाला तिप्पट असे बिल येत आहे. अनेक व्यापाऱ्यांना बंद दुकानाचे बिल सुद्धा वाढव्य आले आहत. त्यामुळे उर्जामंत्री महोदयांना विनंती आहे कि, तात्काळ विद्युत विभागाची बैठक घेऊन या बिलात सुधारणा करण्याचे आदेश द्यावे. मध्यप्रदेश सरकारने 50% वीज बिल माफ केले, मात्र या निर्लज्ज सरकारला जनतेची दया आली नाही. आपली असमर्थता न दाखवता नेहमीच केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीत आहे. बिलाचे रकमेवर व्याज व इतर खर्च रद्द करावे , अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.

यावेळी मंडळ अध्यक्ष संजय अवचट, प्रा.प्रमोद पेंडके, महेंद्र राऊत, प्रभाग अध्यक्ष प्रेम कुर्रे, शैलेश शाहू, मुरलीधर वडे, राजेश ठाकूर, गणेश पौनीकर, अतुल खोब्रागडे, किशोर डवले, बाळू वैद्य, संजय वानखेडे, अभय मोदी, आशिष मर्जीवे, सुरेंद्र समुंद्रे, नरेश चिरखारे, भारत सारवा, बाळू शिंदे, शंकर गौर, देवेंद्र बिसेन, संजय मानकर, राजू दिवटे, कपिल लेंडे, अशोक देशमुख, राजेश संगेवार, सुरेश बारई, प्रशांत मानापुरे, प्रविण बोबडे, आशिष कनोजे, विजय ढोले, पिंटू गिऱ्हे, प्रितम देशमुख व पूर्व नागपूरचे सर्व नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले.