Published On : Wed, Jul 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरसह विदर्भात भाजपने खेळला ‘ओबीसी कार्ड’ !

- शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करून मतांवरील पकड केली मजबूत
Advertisement


नागपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. याकरिता भाजपने आतापासून मोर्चे बांधणीला सुरुवात केली. भाजपने अलीकडेच विदर्भातील शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या नवीन नियुक्त्या केल्या. यात ओबीसी समाजाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतांवरील पकड मजबूत करण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील शहर व जिल्हाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी एक समिती तयार केली. मितीने विविध जिल्ह्यातील जातीय समीकरणाचा अभ्यास केला. त्या अनुषंगाने विदर्भात नागपूर शहर, ग्रामीण, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर शहर व ग्रामीण, गडचिरोली या पूर्व विदर्भासह पश्चिम विदर्भातही पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. भाजपाकडून या नियुक्त्या करताना ओबीसीतील नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.नागपुरात बजरंगदल ते भाजप असा प्रवास करणारे बंटी कुकडे यांची शहर अध्यक्षपदी तर माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नागपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. हे दोन्ही नेते ओबीसी समाजाचे आहेत.

अमरावतीमध्ये जिल्हाध्यक्षपदी नियुक्त खासदार अनिल बोंडे असो किंवा शहर अध्यक्षपदी नियुक्त माजी मंत्री प्रवीण पोटे असो, खामगावमध्ये सचिन देशमुख, गोंदियामध्ये येशुलाल उपराळे तर भंडारा जिल्ह्यात प्रकाश बाळबुधे, गडचिरोलीत प्रशांत वाघरे, चंद्रपूर शहर अध्यक्षपदी राहुल पावडे, जिल्हाध्यक्षपदी हरीश देशमुख यांची नियुक्ती कण्यात आली आहे. हे सर्व ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. वडणुकीच्या पाश्वभूमीवर बुथप्रमुख, पेजप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख नियुक्त करण्यात आले. यातही ओबीसीमधील तरुणांना प्राधान्य देण्यात आले आहे. यावर भाजपचे प्रवक्ते चंदन गोस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपने नेहमीच ओबीसी समाजाला संघटनात्मक पातळीवर आणि सरकारमध्येही प्राधान्याने संधी दिली आहे. त्यासोबतच इतर समाज घटकांनाही न्याय देण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात येत आहे.

Gold Rate
04 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,60,300 /-
Gold 22 KT ₹ 1,49,100 /-
Silver/Kg ₹ 2,87 100 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement