Published On : Wed, Feb 10th, 2021

भाजपा तर्फे प्रभाग 35 मध्ये हळदी कुंकाचे कार्यक्रम आयोजित

नागपुर– भारतीय जनता पार्टी प्रभाग 35 क तर्फे नगर सेविका सौ. विशाखा ताई मोहोड यांचे तर्फे वॉर्डाच्या नवनियुक्त अध्यक्षा छबू ताई तुपे, आणि वॉर्डा च्या महामंत्री, सुनीता ताई शिंदे यांच्या मार्फत वॉर्डात तीन ठिकाणी हळदी कुंकूचे कार्यक्रम घेण्यात आले. अजनी रेल्वे कॉटर, पार्वती नगर, रमा नगर, या ठिकाणी हळदी कुंकूचे कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

या ठिकाणी महिला सक्षमी कर्णावर भर देण्यात आले. कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौ, सरिता तिवारी, नागपूर शहराच्या अनुसूचित जाती मोर्च्याच्या उपाध्यक्षा नूतन ताई शेंदुर्णीकर उपस्थित होत्या.

छबू ताई तुपे अध्यक्ष आणि सुनीता शिंदे महामंत्री झाल्याबद्दल प्रभागातफे त्यांचे स्वागत करण्यात आले,₹. यावेडी, पुष्पा पाटील, बेबी हरोडे, सोनल सहारे, सोनाली सोनटक्के, सरिता बोन्डाडे, आणि मोठ्या संख्येत महिला उपस्थित होते.