Published On : Fri, Sep 18th, 2020

पूरग्रस्तांना तोकडी मदत भाजपाने बावनकुळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Advertisement

शासन आदेशाची केली होळी

नागपूर: जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शासनाने घोषित केलेली मदत अत्यंत तोकडी असून पूरग्रस्तांच्या जखमेवर शासनाने मीठ चोळल्याचा हा प्रकार असल्याची टीका भारतीय जनता पार्टीने केली असून शासन आदेशाची भाजपतर्फे होळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावेळी भाजप नेत्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.

नागपुर जिल्हयात दिनांक २७ ,२८ ऑगष्ट रोजी मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदयांना मोठया प्रमणात पुर आला त्याचा फटका जिल्‍हयातील अनेक गांवाना व नदी लगतच्या क्षेत्रांना बसला असुन मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नैर्सगीक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या नागरीकांना शासन निर्णय क्रं.सीएलएस-२०२०/प्र.क्रं.२३८/म-३ दिनांक १५ सप्टेंबर,२०२० या शासन आदेशा नुसार मिळणारी मदत अतिशय तोकडी असुन नागरीकांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान पाहता शासनाकडुन मिळणारी मदत म्हणजे केवळ तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. असे म्हणत आज जिल्हा भाजप च्या नेत्यांनी प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तांना निवेदन देवुन शासन आदेशाची होळी केली.

यावेळी त्यांचे सोबत आमदार गिरीश व्यास,आमदार अनिल सोले,आमदार समीर मेघे,आ.टेकचंद सावरकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.राजीव पोतदार ,माजी आमदार सुधीर पारवे,डी मल्लीकार्जुन रेडडी,अशोकराव मानकर,चरणसिग ठाकुर,आंनदराव राउत जिल्हा संघटन महामंत्री किशोर रेवतकर, महामंत्री अविनाश खळतकर,इमेश्वर यावलकर, अजय बोढारे,अनिल निधान, उकेश चौहाण, संजय टेकाडे,संध्याताई गोतमारे, संदीप सरोदे, विशाल भोसले, अंबादास उके, बबलु गौतम, आदर्श पटले, सोनबाजी मुसळे,ॲड प्रकाश टेकाडे,मनीष वाजपेयी,राजेश ठाकरे,कमलाकर मेंघर,प्रतिभा गवळी, शुभांगी गायधने,माया पाटील,कपील गायधने,राहुल किरपान, अंजली कानफाडे,शामराव बारई, सुनील कोरडे,सुभाष गुजरकर, आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले की,
पुरामुळे वाहुन गेलेल्या घरांसाठी व घरातल्या सामानांसाठी प्रति कुटंब केवळ रु ५००० (पाच हजार) स्नानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय म्हणजे पुरग्रस्त नागरीकांची क्रुर थटटा आहे. लाखो रुपयांचे सामान वाहुन गेले असतांना किंवा क्षतीग्रस्त झाले असताना ही मदत अपुरी असुन जिल्हा भाजपाच्या वतीने यापुर्वी दिलेल्या निवेदनांत प्रति कुटुंब रु २५ हजार देण्याची मागणी केली आहे.

Advertisement

पुरग्रस्त शेतक-यांना शेतातील पिके नष्ट झाल्यामुळे झालेल्या नुकसानी पोटी जिरायत खालील पिंकासाठी प्रति हेक्टरी केवळ रु ६८०० व बहुवार्षीक पिकांसाठी प्रति हेक्टरी रु १८००० मदत उपरोक्त शासन निर्णया प्रमाणे घोषीत मदतही अपुरी असुन प्रति हेक्टरी रु ५० हजार सरसकट देण्यात यावे अशी जिल्हा भाजपाची मागणी आहे.

यावेळी बोलतांना जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये म्हणाले की जनावरांच्या गोठयासाठी प्रति गोठा रु ३००० तर दुकानदार पान टपरी हात गाडी या सारख्या छोटया उदयोंगांच्या नुकसान भरपाईपोटी केवळ रु १०००० नुकसान भरपाई देण्याचे उपरोक्त आदेशात नमुद करण्यात आले असुन ही मदत देखील अपुरी आहे. जनावरांच्या गोठयासाठी किमान प्रति गोठा रु १०००० तर दुकानदार पान टपरी हात गाडी या सारख्या छोटया उदयोंग धारकांना किमान २५००० रु नुकसान भरपाई पोटी देण्याची जिल्हा भाजपाची मागणी आहे.

पुर ओसरल्यानंतर त्वरीत खावटीची मदत करणे अपेक्षीत असतांना पुर येवुन १५ ते २० दिवसांचा कालावधी लोटल्यांनतरही मदत अजुनही पुरग्रस्त नागरीकांच्या हाती पडली नाही हे दुर्देवच म्हणावे लागेल, असेही बावनकुळे म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.