Published On : Sat, Jun 14th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात भाजप नेते रस्त्यावर; पोलिसांवर गंभीर आरोप करत DCP कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

Advertisement
नागपूर – राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगरीतच भाजपचे नेते रस्त्यावर उतरले असून, पोलिस विभागाच्या कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन छेडले आहे. भाजपचे स्थानिक नेते बाल्या बोरकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्व नागपूरमध्ये ड्रग्ज व गांजाची खुलेआम विक्री होत असल्याच्या निषेधार्थ आज DCP कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

भाजप नेते बाल्या बोरकर यांनी थेट पोलिसांवरच गंभीर आरोप करताना सांगितले की, “ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील व्यापाऱ्यांकडून पोलिसांकडून हप्तेखोरी केली जाते. मादक पदार्थांचा धंदा बिनधास्त सुरू आहे आणि पोलिस यंत्रणा मूग गिळून बसली आहे.

या आंदोलनादरम्यान त्यांनी DCP यांना निवेदन देत पोलिसांच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गृहमंत्री फडणवीस यांच्याच शहरात जर पोलिसांचा वचक राहिला नसेल तर राज्यात काय परिस्थिती असेल?” असा सवाल करत त्यांनी पोलिस प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली.

कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला आणि ड्रग्जच्या वाढत्या साखळीद्वारे युवकांचं भवितव्य उद्ध्वस्त होत असल्याचे सांगत पोलिस दलाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला.

मुख्य मुद्दे:

–पूर्व नागपुरात गांजा व ड्रग्ज विक्रीचे प्रकरण

Advertisement

-पोलिसांकडून हप्तेखोरीचे आरोप

-भाजप नेतेच गृहमंत्र्यांच्या विभागाविरोधात रस्त्यावर-DCP कार्यालयात निवेदन सादर

दरम्यान सध्या या आंदोलनामुळे नागपुरातील पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.