Published On : Sun, Jul 28th, 2019

भाजपा कन्हान महिला आघाडीचा महिला मेळावा संपन्न

कन्हान : – भारतीय जनता पार्टी महिला आघाडी कन्हान शहर च्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन अँड सौ मनिषा विजय पारधी यांच्या नेतुत्वात माजी नगराध्यक्षा अँड आशाताई सनोज पनिकर यांचे निवासस्थान स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे करण्यात आले होते.

महिला मेेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणुन भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ. प्रतिभाताई मांडोवकर, जिल्हा महामंत्री डॉ. माधुरी बावनकुळे, जिल्हा महामंत्री रेखाताई दुनेदार,तालुका महिला आघाडी अध्यक्षा अनिता भड, ग्रा पं टेकाडी सरपंचा सुनिताताई मेश्राम, न.प कन्हान नगरसेविका सौ सुषमाताई चोपकर, सौ राखीताई परते, ग्रा पं उपसरपंच मीनाक्षी बुधे, ग्रा पं टेकाडी सदस्या सिंधु सातपैसे, सौ कल्पनाताई मेहरकुळे, सौ पौर्णिमा दुबे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

मेळाव्यात अँड आशा ताई पनिकर हयानी शासना व्दारे महिला करिता असलेल्या विविध योजना विषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गौरीताई कनपटे, लक्ष्मी नागपुरे, लिला करणवार, ममता निंबोने, मनिषा सिल्लारे, इंदुबाई खांडारे, अनुसया मोहणे, सरस्वती बागडे, राधाबाई मानीपुरी, प्रिती बागडे, लताबाई भोजने, इंदिरा मदन, जयश्री बागडे, प्रिया पोटे, कांता बागडे, प्रमिला मडावी, निर्मला ढोबळे, ममता पाल, प्रमिला पास्पलवार, सती कनोजिया, सविता राऊत, राजेश्वरी मेश्राम, लक्ष्मी मेश्राम आदी मोठय़ा संख्येने महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन भाजपा महिला आघाडी अध्यक्षा अँड मनिषा पारधी हयानी तर आभार प्रदर्शन महिला आघाडी महामंत्री पुनम राठी हयानी केले.