Published On : Mon, Nov 9th, 2020

पारडी पुलासाठी आज पूर्व नागपुरातील भा.ज.प. नगरसेविकांचे NHAI ला डेप्युटेशन

नागपूर : उपमहापौर मनिषा कोठे यांचे नेतृत्वात पूर्व नागपुरातील भा.ज.प. च्या महिला नगरसेविका आज सोमवार दि.09/11/2020 रोजी सकाळी 11 वा. एन.एच.ए.आय. चे क्षेत्रीय प्रबंधक राजीव अग्रवाल यांची भेट घेऊन निवेदन देणार.

उपमहापौर यांनी सांगितले की, एक दिवशी पारडी ब्रिज व मेट्रोचे भूमिपूजन होऊन देखील पारडी पुलाचे काम अर्धेदेखील झाले नाही. पारडी पुलाच्या कामात लेटलतीफी होत असल्यामुळे रस्त्याची हलत विकट झाली असून वाहतूक देखील अस्तव्यस्त झालेली आहे. अनेक निर्दोष नागरिकांना या रस्त्यावर आपले प्राण गमवावे लागले असून आपला जीव हातात घेऊन नागरिक या रस्त्यावरून जात आहेत.

त्यामुळे यापुढे जर जाही दुर्घटना झाली तर यासाठी NHAI जबाबदार राहणार काय? पारडी पूल केव्हा पूर्ण होणार? या प्रश्नाचे उत्तर अधिकारी देऊ शकतील काय? अशा आशयाचे निवेदन आज पूर्व नागपुरातील भा.ज.प. च्या सर्व महिला नगरसेविका देणार असल्याचे त्यांनी सांगितले.