नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत “फ्लाइंग किस” केल्यामुळे सत्ताधारी भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गांधी विरोधात मंत्री स्मृती ईराणी आणि भाजपच्या महिला खादारांनी आवाज उठवला. या प्रकरणावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. नागपूर प्रेस क्लबमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला सरकार उत्तर देऊ शकत नाही. मणिपूरवर बोलायला त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे भाजपने महिलांना पुढे करून राहुल गांधी यांना बदनाम करण्याचे नवीन शस्त्र शोधले.णिपूर दंगल सरकार पुरस्कृत आहे. या मुद्द्यावर लोकांचे लक्ष विचलित करण्याचा भाजपने हे प्रकरण निर्माण केले.
मणिपूर दंगल सरकार पुरस्कृत आहे. या मुद्द्यावर लोकांचे लक्ष विचलित करण्याचा भाजपचे प्रयत्न असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.