Advertisement
गोंदिया : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. विदर्भात अजित पवार गटाने भाजपाला धक्का देत मोठा नेता गळाला लावला.माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. त्यामुळे राष्ट्रवादीला विदर्भात बळ मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियात राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे.
राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. राजकुमार बडोले यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा पक्षात समावेश केल्यास पक्षाची स्थिती मजबूत होईल, असे अजित पवार म्हणाले.