Published On : Thu, Sep 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपचं ठरलं; विधानसभेसाठी ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार

Advertisement

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली. भाजपच्या कोअर कमिटी आणि निवडणूक समितीची २३ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून लवकरच ५० उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

भाजपच्या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि अन्य नेते उपस्थित असतील. या बैठकीमध्ये उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होईल आणि पितृपक्ष संपल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात येणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनेही जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात केली आहे. तीनही पक्षांनी विभागवार आपले अहवाल बैठकीत मांडले. ही चर्चा सलग तीन दिवस सुरु राहणार असून कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे या बैठकीत ठरविले जणार आहे.

काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर उद्धव सेनेकडून नेते संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.