Published On : Sat, May 30th, 2020

भाजपा-कांग्रेस च्या नेत्यांना आप पार्टी चा सवाल ?

Advertisement

आयुक्त तुकाराम मुंडेच्या समर्थनाथ आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल

नागपूर- संपूर्ण देशातच नव्हे तर जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या महामारीने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला हादरून सोडले आहे. देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये यामुळे परिस्थिती फारच बिकट झाली आहे. सरकारी संपूर्ण देशातील सरकारी यंत्रणा कोलमडली आहे. आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छता विभाग सोडले तर इतर विभागांचे कामकाज पूर्णपणे बंद पडेले आहे. दोन महिन्यापूर्वी नागपूर शहरात सुद्धा कोरोना पेशंट भेटायला सुरवात झाली. परंतू कर्तव्यदक्ष अधिकारी आयुक्त तुकाराम मुंडे आणि त्यांची चमू यांनी नागपुर शहरात कोविड़-19 रोगा विरुद्धच्या लढाईची कमान उत्कृष्ट प्रकारे सांभाळली आहे. नागपुर शहराचा रोगमुक्तता (रिकव्हरी) दर तब्बल ८२% आहे, जो देशतल्या सर्वोउत्कृष्ट शहरांपैकी एक आहे.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या रोगमुक्तता दराचे महत्वाचे कारण म्हणजे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांची त्वरित निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयाची १००% इमानदारीने अमलबजावणी करून घेण्याची क्षमता.

आयुक्त यांनी उत्कृष्ट प्रकारे शासकीय यंत्रनेकडून चोख अमलबजावणी करून घेतली. वेळो वेळी कॉन्टेक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाइन ह्या प्रक्रिएला वारंवार उत्कृष्ट प्रकारे राबविले. ज्या क्षेत्रात एक-दोन पेशंट मिळाले त्या क्षेत्राला केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार मोठ्या प्रमाणात लोकांना क्वारंटाइन करण्याची मोहीम आयुक्त यांनी राबविली. या निर्णय क्षमतेमुळे आज नागपूर हे देशाली उत्कृष्ट रोगमुक्तता दर प्राप्त करण्यास निर्णायक ठरत आहे. अशा आणिबाणीच्या परिस्थितीत कठोर निर्णय ही काळाची गरज आहे.

कांग्रेस व बीजेपी जे कर्मांनी नाही परंतु जन्मानी एक दुसऱ्यांचे दुश्मन आहेत परंतु जेंव्हा जेंव्हा इमानदार अधिकारी एखाद्या शहरात येतो तेंव्हा हे एकत्र येतात, याचे कारण आपण सर्वांना माहितच आहे. याचीच प्रचीती कालच्या दोन्ही पक्षांनी सोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून येतच. या प्रेस-कॉन्फ्रेंस मधून कांग्रेस, भाजपा मिळून महानगरपालिका सदन मध्ये तुकाराम मुंडे यांच्याविरुद्ध प्रस्ताव आणण्याची धमकी दिली. आम आदमी पार्टी ह्या जनविरोधी धमकीचा / प्रस्तावाचा निषेद करते. असल्या प्रकारचा जनविरोधी प्रस्ताव आल्यास आम आदमी पार्टी जनतेबरोबर आंदोलन करेल व वेळ पडल्यास रस्त्यावर सुद्धा उतरेल.

प्रश्न आहे मागील दोन अडीच दशकात नागपुर महानगरपालिके मध्ये बीजेपी – कांग्रेस -बीजेपा ची राजवट आहे. आता सलग १३ वर्षांपासून बीजेपी सत्तेवर आहे. मनपा नव्हेतर राज्य आणि केंद्रात मागील पाच वर्षे यांचीच सत्ता होती. या काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षानी किती हॉस्पिटलची उभारणी केली ? मनपाच्या हॉस्पिटल मध्ये एकतरी पूर्णकालीन डॉक्टर आहे काय, किती दवाखान्यात किती बेड आहेत, काय औषधी आहेत, किती दवाखान्यात व्हेंटीलेटर आहेत ? आरोग्यसेवेवर मनपा महिन्याला अंदाजपत्रकातील किती टक्के रक्कम खर्च करते, या सर्व बाबतीत सविस्तर माहिती नागपुरातील जनतेसमोर ठेवावी.

दुसरा प्रश्न आहे, नागपूर शहर टंकर मुक्त झाले काय, तुमची फसवी २४ x ७ पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली काय ?

नागपूर शहरातील १५३ पैकी एखादा वार्ड पूर्णपणे विकसित केला काय ?

शहरात एखादा फुटपाथ चालण्यायोग्य आहे काय ?

शहरातील मनपाच्या शाळा मुलांना शिक्षण देण्यास परिपूर्ण आहेत काय ?

नागपुरातील कचरा संकलन आणि त्याची विल्लेवाट होत आहे काय?

आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून अनेक प्रश्नाची उत्तरे जनतेला आपेक्षित आहेत.

आम आदमी पार्टी युवा आघाडी राज्य समिती सदस्य कृतल वेळेकर आकरे आणि आम आदमी पार्टी युवा आघाडी विदर्भ रिजन संयोजक पियुष आकरे यांनी आज या प्रेस नोट च्या माध्यमातून वरील सर्व प्रश्नांचे उत्तरे मागत आहे. जर खरोखर नागपूर चा विकास केला असेल तर आजच यांनी जनतेसमोर येवून खुलासा करावा.

Advertisement
Advertisement