नागपूर :लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतील पाठिंबा जाहीर केला.राज्यात ठिकठिकाणी राज ठाकरे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. . राज ठाकरेंना फाईल दाखवून भाजपने प्रचाराला लावलं असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या लाईन मध्ये फिट होते. मात्र त्यांना दिल्लीत बोलावून काही फाईल दाखवल्या गेल्या आणि सांगितले गेलं की, प्रचार आमचाच कराव लागेल.
म्हणून त्यांना आज अशा पद्धतीने महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागत असल्याचे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
राज ठाकरेंच्या या आवाहनाला लोक कितपद प्रतिसाद देतात हे येणार काळच सांगेल.
देशाचे पंतप्रधान गल्लोगल्लीत प्रचार करताय त्यांच्यावर ही वेळ येणे म्हणजेच दुर्दैवच म्हणावे लागेल. हे त्यांच्या प्रतिष्ठेला हे साजेसे आहे का?असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.मात्र हे नेते जितक्या जास्त सभा घेतील तितकाच मोठा यांचा पराजय होणार आहे, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला.