Published On : Thu, Apr 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात भाजपचा विरोधकांवर हल्लाबोल; महिलांच्या हक्कांवरून जोरदार टीका

Advertisement

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री सी आर पाटील आणि राज्यसभा सदस्य दर्शना सिंग यांनी महिलांच्या हक्कांच्या मुद्द्यावरून विरोधकांवर तीव्र टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना सी. आर. पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने ठोस निर्णय घेत आहे. महिला आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयांवर विरोधक केवळ राजकारण करत असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी दर्शना सिंह यांनीही विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात विरोधकांच्या धोरणांचा मोठा अडथळा राहिला आहे. महिलांचे अधिकार हिरावून घेण्याचे काम विरोधकांनी केले, तर आम्ही त्यांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे त्या म्हणाल्या.

या पत्रकार परिषदेत भाजपने महिलांच्या सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका ठामपणे मांडत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.