Published On : Sun, Jul 1st, 2018

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

Advertisement

मुंबई: माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा येथील निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड, अवर सचिव महेश वावळ आदींनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.