Published On : Thu, Oct 17th, 2019

बॉयोमेडीकल कचरा सर्व साधारण कच-यात टाकल्याने २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई

Advertisement

मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी : २ लाख १९ हजार रुपये दंड वसूल

नागपूर : दवाखाने, रुग्णालयांमध्ये निर्माण होणारा बॉयोमेडीकल कचरा वैद्यकीय व्यवसायिकांमार्फत सर्वसाधारण कच-यामध्ये टाकण्यात आल्याच्या प्रकरणात मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे २३ वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. दहाही झोनमध्ये तैनात उपद्रव शोध पथकाद्वारे २३ वैद्यकीय व्यावसायिकांकडून २ लाख १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी (ता.१५) सीताबर्डी येथील एका वैद्यकीय व्यावसायिकामार्फत बॉयोमेडीकल कचरा सर्वसाधारण कच-यात टाकण्यात आल्याने त्यांच्याकडून धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. स्वच्छता निरीक्षक जयंत जाधव, उपद्रव शोध पथकाचे धरमपेठ झोन टिम लिडर आशिष कटरे यांच्यासह झोनच्या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे स्कॉड लिडर विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपले नागपूर स्वच्छ, सुंदर राहावे तसेच येथील कच-याची योग्य विल्हेवाट लावावी यासाठी मनपातर्फे कार्यवाही केली जात आहे. मात्र अनेकदा नियमांचे उल्लंघन करुन स्वच्छ नागपूरच्या संकल्पनेला अडसर निर्माण केला जात आहे. यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे झोनस्तरावर उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. शहर स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण करून अस्वच्छता पसरविणा-या व्यक्तींवर कारवाई करुन स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम उपद्रव शोध पथकाद्वारे सुरू आहे.

उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांनी बॉयोमेडीकल कचरा सर्वसाधारण कच-यात टाकणा-या २३ वैद्यकीय व्यवसायिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.

Advertisement

लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक कारवाई

उपद्रव शोध पथकाद्वारे दहाही झोनपैकी लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. दहाही झोनमध्ये एकूण २३ प्रकरणात लक्ष्मीनगर झोनमध्ये ७ जणांवर कारवाई केली आहे. यापाठोपाठ धंतोली झोनमध्ये ६, मंगळवारी झोनमध्ये ५, तर धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर, सतरंजीपूरा, लकडगंज झोनमध्ये प्रत्येकी एका वैद्यकीय व्यवसायिकावर कारवाई करुन दंड वसूल करण्यात आले आहे. गांधीबाग व आसीनगर झोनमध्ये अद्यापपर्यंत एकही कारवाई झालेली नाही.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.