Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Wed, Jun 19th, 2019

रामटेक-नगरधन रोडवर शनी मंदिराजवळ पिकअपची बाईकला जोरदार धडक

आई व मुलाचा मृत्यू परिसरात हळहळ

रामटेक: तारस्यावरून रामटेककडे येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पीक अप गाडी क्रमांक MH40 AK0736 ने आपल्या नातेवाईकाकडे निमखेडा व नेरी (गादा) येथे नगरधन मार्गे हिरो पॅशन MH40 AJ57क्रमांकाच्या बाईकने जात असलेल्या राजु नत्थु मेहरकुळे (46) व त्याची आई लिलाबाई नत्थु मेहरकुळे (67)यांच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने आईचा जागीच मृत्यू झाला तर मुलाचे दवाखान्यात आणतांना निधन झाले.

ही घटना रामटेक-नगरधन रोडवर शनिमंदिरासमोर सकाळी 11वाजून 51 मिनिटांनी घडली . बाईकला धडक दिल्यावर पांढऱ्या रंगाच्या पीक अप गाडी सुसाट वेगाने व निष्काळजीपने इतर वाहनांना कट मारत रामटेक कडे पळाली .जोरदार आवाज ऐकू आल्यावर समोरील पानठेला चालक शुभम भैयाजी मेंघरे व त्याचा मित्र अमित बालाजी नागपुरे यानी गाडीचा पाठलाग करून रामटेक-चिचाळा रोडवरील फ्युचर पॉईंट स्कूलजवल गाडीचालक गोपाल महादेव चौधरी (42)यास पकडून रामटेक पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब राजू मेहरकुळे यास तात्काळ दवाखान्यात आणले पण त्याचीही प्राणज्योत मालवली.मृतक दुधाळा(कवडक) येथील रहिवासी असून शेतीचा व्यवसाय करीत होते.त्यांच्या पाठीमागे म्हातारे वडील ,पत्नी ,दोन मुली एक मुलगा असून त्यापैकी एक मुलगी विवाहित आहे.आई आणि मुलाच्या अकालिपणे अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

कलम279,304 (अ)भादवी R /W 184 मो वा का अनवये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सरकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू मृत्यूपोड,पोलीस हवालदार राऊत पोलीस शिपाई राजेंद्र अडामे,नुरिया, ओमप्रकाश कोडवते, आकाश शिरसाट अनिल इंगळे,आशिष कुमरे करीत आहेत.

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145