Published On : Tue, Oct 15th, 2019

बीकेसीपी शाळेच्या रौनक सिंग ला स्वर्ण तर इसिका ला काश्य पदक

कन्हान: जिल्हा क्रिडा परिषद नागपूर व्दारे क्रिडा संकुल मानकापुर नागपुर येथे झालेल्या पावसाळी जिल्हा स्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान चे खेडाळु रौनक सिंग ने उंच उडी मध्ये स्वर्ण तर इसिका यादव ने काश्य पदक पटकावित इतर खेडाळुनी सुध्दा घवघवीत यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद नागपुर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पावसा ळी जिल्हास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धा क्रिडा संकुल नागपुर ला घेण्यात आल्या. यात १७ वयोगटात मुलीं मध्ये १०० व २०० मी. दौड (धावने) आणि लांब उडी मध्ये सानिका अनिल मंगर प्रथम क्रमांक पटकाविला. हातोडा फेक मध्ये हिमागी नाटकर ने प्रथम क्रमांक प्राप्त केला. १५०० मी दौड मध्ये भुमिका भोस्कर ने तृतीय क्रमांक प्राप्त केला. ५ कि.मी. चालणे यात वैभव सिंग ने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच बीकेसीपी शाळेच्या खेडाळुनी ४ × १०० रिले दौड १७ वर्षा आत मुलीं मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर ४ × १०० रिले दौड १४ वर्षा आत मुला मध्ये द्वितीय स्थान प्राप्त केला. विशेष म्हणजे रौनक सिंह ने उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करित स्वर्ण तर इशिका यादव हीने उंच उडी मध्ये तृतीय स्थान प्राप्त करून काश्य पदक मिळविले.

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शाळेचे सर्व खेळाळु क्रिडाशिक्षक अमित ठाकुर यांचे मार्गद र्शनात नियमीत सराव करीत असुन डी.एस.ओ शालेय विभागीय मैदानी स्पर्धेकरिता सानिका अनिल मंगर , हिमांगी नाटकर, रौनक सिंह आणि ४ × १०० रिले दौड १७ वर्षा आत मुलीं ची निवड झाल्याने शाळेच्या खेडाळुनी घवघवीत यश संपादन केल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष राजीव खंडेलवाल, सचिव गेरोला मॅडम, मुख्याध्यापीका कविता नाथ, क्रिडा शिक्षक अमित ठाकुर व सर्व शिक्षक वृंदानी, विद्यार्थ्यांनी खेळाळुचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

– एम व्ही रहाटे, कन्हान

Advertisement
Advertisement