Published On : Wed, Apr 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक जखमी; मनसर–कांद्री मार्गावरील भीषण अपघात

Advertisement

नागपूर : जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाणे हद्दीत मनसर–कांद्री मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नादिर खान नासीर खान हा आपल्या नातेवाईक अनवर जाफर खान याच्यासोबत पल्सर दुचाकीने मनसरहून कांद्रीकडे जात होता. त्याचवेळी नागपूरहून जबलपूरकडे जाणाऱ्या लाल रंगाच्या भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नादिर खान याचा जागीच मृत्यू झाला, तर अनवर जाफर खान गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच रामटेक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून जखमीला उपचारासाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.