नागपूर : शहरात स्थानिक पातळीवर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची साथ सोडत पक्षाच्या ४० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या ब्लॉक १४ तर्फे कार्यकर्ता संमेलन आणि पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात शहर काँग्रेसचे अध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे आणि ब्लॉक १४ चे अध्यक्ष दीपक खोबरागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी एमआयएमच्या ४० कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. सर्व कार्यकर्त्यांनी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसच्या पक्षप्रेवश सोहळ्यात इफ्तेखार अंसारी, ॲड. जितेंद्र वेलेकर, लालाजी जायसवाल, संदीप सहारे, इंद्रपाल वाघमारे, सलमान अंसारी, लुकमान अंसारी, जलील अंसारी प्रामुख्याने उपस्थित होते.