Advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये तुतारी आणि पिपाणी चिन्हांवरून संभ्रम निर्माण झाला होता. याचा फटका शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता.
तुतारी आणि पिपाणी या एकसारख्या दिसणाऱ्या चिन्हामुळे नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा पराभव झाला. कारण मतदारांनी तुतारी चिन्हाला मत न देता पिपाणी या चिन्हांवर मतदान केले.
याबाबत शरद पवार गटाने निवडणुक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली होती.या तक्रारीमध्ये त्यांनी पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये आम्हाला फटका बसल्याची भावना व्यक्त करत हे चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.
त्यांच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे.