नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ ने कौशल्यपूर्ण कारवाई करत चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
माहितीनुसार, मध्य प्रदेशातील कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अप.क्र. ६८०/२०२३ या गुन्ह्यातील आरोपी भुरा नेतराम गौर (५५, रा. नर्मदापुरम) हा दीर्घकाळापासून पोलिसांना चकवा देत होता. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (अ), २९४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
२२ मार्च रोजी गुन्हे शाखेचे पथक नागपूरमध्ये गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे वाठोडा परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले.
त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित आरोपीला मध्य प्रदेशातील कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) डॉ. राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम यशस्वी केली.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





