Published On : Tue, Jan 30th, 2024
By Nagpur Today Nagpur News

विदर्भात मत्स्योत्पादनाला मोठी संधी,50 हजार कोटींची निर्यात शक्य : नितीन गडकरी

Advertisement

नागपूर : विदर्भातून 50 हजार कोटींची मत्‍स्‍योत्पादन निर्यात शक्य असल्याचे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
विदर्भात (Vidarbha) खारे आणि गोडे असे दोन्ही स्वरूपाचे जलाशय उपलब्ध आहेत. येथे मत्स्योत्पादनाला मोठी संधी आहे. जर राजस्थानसारख्या वाळवंटातून जर वर्षाकाठी 2000 कोटींची निर्यात होऊ शकत असेल तर विदर्भातून देखील 50 हजार कोटींची मत्‍स्‍योत्पादन निर्यात का होऊ शकणार नाही,असेही गडकरी म्हणाले.

खासदार औद्योगिक महोत्सव-अ‍ॅडव्हांटेज विदर्भच्या तिसऱ्या दिवशी मत्स्योत्पादनावर विशेष चर्चासत्र झाले. यावेळी नितीन गडकारी बोलत होते. चर्चासत्रादरम्यान मत्स्यशेतीवर दीर्घकाळापासून संशोधन करणारे डॉ. उल्हास फडके यांच्या ‘इकॉनॉमिक्स ऑफ इनलँड फिशरीज’ या पुस्तकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.तलावांची व्हावी स्वच्छता पारंपरिक मत्स्यशेती करताना येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना मत्स्योत्पादक प्रभाकर मांढरे यांनी ज्या तलावांचे वय 40 ते 50 वर्षे जुने आहे, त्या तलावांची स्वच्छता करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तलावातील गाळ काढल्यास मत्स्यशेती अधिक दर्जेदार होईल, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच मागणीच्या तुलनेत मत्स्यबीजांचा पुरवठा होत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

Gold Rate
23 July 2025
Gold 24 KT 1,00,900 /-
Gold 22 KT 93,800 /-
Silver/Kg 1,16,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महोत्सवाच्या मंचावर विदर्भातील सर्वात मोठे इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस ॲण्ड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह होत आहे. 27 जानेवारी ते 29 जानेवारी असा तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात करण्यात आले आहे. आज या महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाला मत्स्योत्पादनावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त पुल्केश कदम यांनी शोभिवंत माशांचे उत्पादन कमीत कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न देणारे असल्याचे सांगत, पारंपरिक मत्स्योत्पादनाला प्रक्रिया उद्योगांची जोड देण्याची गरज व्यक्त केली.तर ऑस टेक इंडस्ट्रिज प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम देशमुख यांनी मॉडर्न अ‍ॅक्वाकल्चर प्रॅक्टिसेसबाबत मार्गदर्शन केले.

Advertisement
Advertisement