Published On : Thu, Nov 14th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात तहसील पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकीवरून १.३५ कोटी रुपये जप्त

Advertisement

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडाव आचारसंहिता भंगसह काही नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मोठी कारवाई करत पोलिसांनी एका दुचाकीवरून १.३५ कोटी रुपये जप्त केले. पोलिसांनी दुचाकी चालकाला अटक केली आहे. साकीर खान हाजी नसीर खान (४२, रा. यशोधरा नगर) असे आरोपीचे नाव आहे. चौकशीदरम्यान ही रक्कम कोणाची होती, याबाबत आरोपींना माहिती देता आली नाही. प्राथमिक तपासात मनी लाँड्रिंगचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरु केला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील पोलिस बंदोबस्तात सातत्याने वाहनांची तपासणी करण्यात येत होती. याच दरम्यान, दुचाकीवरून येणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. त्याआधारे वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. जिथे पोलिसांना १.३५ कोटी रुपये रोख सापडले. पैसे सापडताच पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. ही रक्कम कोणाची आहे, अशी विचारणा केली असता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही तसेच पैशाचे कोणतेही कागदपत्रही सादर करू शकला नाही. निवडणुकीच्या वेळी मिळालेली रक्कम पाहता पोलिसांनी पैसे आणि दुचाकी असा एकूण १.५० कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.