Published On : Mon, May 15th, 2023

नागपुरात आरपीएफची मोठी कारवाई ; अवैध दलालाकडून ८३ लाखांची तिकिटं जप्त

Advertisement

नागपूर : उन्हाळ्यात सुट्ट्यांचे दिवस सुरु होताच अवैध दलालांनी आपले जाळे पसरत रेल्वे प्रवाशांची लूट सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर शहरात आरपीएफने मोठी कारवाई करत एका दलालाकडून ८३ लाख रुपयांची तिकिटे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.प्रवीण झाडे (४३, रा. प्रोफेसर कॉलनी, हनुमान नगर) असे आरोपीचे नाव आहे.

सॉफ्टवेअरच्या मदतीने ई-तिकीटवर हात :
आरपीएफने त्याच्याकडून 2 लॅपटॉप आणि 1 मोबाईलसह प्रिंटर आदी साहित्य जप्त केले. लॅपटॉप आणि मोबाईल डेटा स्कॅन केल्यावर धक्कादायक बाबी समोर आल्या. हे पाहून आरपीएफही दंग झाले. तपासात पास हॉटलाइनवर काम करणारे सॉफ्टवेअर आरपीएफच्या हाती लागले आहे. ले ज्यामध्ये एका क्लिकवर एकाच वेळी अनेक तत्काळ आणि सामान्य कोट्याची तिकिटे बुक करता येतात. प्रवीणने एक कोटींहून अधिक किमतीची तिकिटे काढून अनेक प्रवाशांची लूट केल्याचे बोलले जात आहे. ही कारवाई वरिष्ठ डीएसएसी आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय आरएल मीना, पीएसआय प्रियंका सिंग, एएसआय अश्विनी पवार, सोनवणे, रामनिवास मीना, अमोल, ललित गुजर, श्याम सरलेयम, मोहनलाल दिवांगण आदींनी केली.

विमानतळावर छापा: एसईसीआर आरपीएफने साधली चुप्पी –
विमानतळावर तिकीट दलाल कर्मचाऱ्याला पकडल्याप्रकरणी दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग आणि झोनच्या आरपीएफ आणि गुन्हे शाखेने मौन पाळले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षित दिनेश जोशी (३३) याला विमानतळावरील तिकीट आरक्षण काउंटरवरून अटक करण्यात आली. छाप्यादरम्यान त्याच्याकडून 8,395 रुपये किंमतींची तिकिटे जप्त करण्यात आली. विमानतळाच्या तिकीट काउंटरवरूनच ही तिकिटे बेकायदेशीरपणे खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. हर्षितकडे IRCTC चा परवाना आहे. तो सोमलवाडा कॅम्पसमध्ये मोबाईल शॉप चालवतो आणि येथून अधिकृत एजंट म्हणून प्रवाशांसाठी तिकीट बुक करतो. मात्र तो अवैधरित्या विमानतळ केंद्रावर येऊन बाहेरील लोकांची तिकिटे काढत होता. छापा टाकल्यानंतर हर्षितला ताब्यात घेऊन मोतीबाग आरपीएफ चौकीत आणण्यात आले आणि त्याच्यावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली.