Published On : Fri, Apr 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मोठी जमीन फसवणूक; ‘मटका किंग’च्या नावावर बनावट पत्नीचा खेळ

Advertisement

नागपूर : शहरातील लकडगंज परिसरात जमिनीशी संबंधित मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. दिवंगत ‘मटका किंग’ समद यांच्या मालमत्तेवर दावा करत एका महिलेने स्वतःला त्यांची पत्नी म्हणून सादर केले आणि बनावट कागदपत्रांच्या जोरावर बिल्डरकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम उकळल्याचा आरोप समोर आला आहे.

माहितीनुसार, खैरुन्निसा नावाच्या महिलेने बेसा येथील जमिनीवर हक्क सांगत समद यांच्याशी वैवाहिक नातं असल्याचा दावा केला. त्यानंतर तिने कागदपत्रांमध्ये फेरफार करून संबंधित जमिनीचा व्यवहार बिल्डर रोहन ठक्कर यांच्याशी केला. या व्यवहारातून तिने एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वेगवेगळ्या टप्प्यांत घेतल्याचे समजते.

दरम्यान, जमिनीची नोंदणी होत नसल्याने संशय बळावला आणि अखेर बिल्डरने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर लकडगंज पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत असून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. समद यांच्या नावावर शहरात अनेक मौल्यवान मालमत्ता असल्याने या प्रकरणाचे स्वरूप अधिक गंभीर मानले जात आहे.

Advertisement

सध्या तपास सुरू असून, येत्या काळात या घोटाळ्याशी संबंधित आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.