Published On : Mon, Oct 14th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्य सरकारचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय;मुख्यमंत्री शिंदेंनी केली टोलमाफीची घोषणा

Advertisement

नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. आज (14 ऑक्टोबर) झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महायुती सरकारने टोलमाफीची घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे.

मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही.आज रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

दरम्यान विधानसभा निवडणूक लक्षात घेता महायुती सरकारकडून जनतेला आकर्षित करण्यासाठी हे निर्णय घेण्यात येत आहे. शिंदे सरकारकडून गेल्या महिनाभरात 165 च्या आसपास निर्णय घेण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.