Published On : Mon, May 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात रेती तस्करीवर मोठी कारवाई; ‘कल्लू खान’ गँगवर MCOCA अंतर्गत गुन्हा!

व्हॉट्सअ‍ॅप नेटवर्कमधून चालायचा रॅकेट
Advertisement

नागपूर : विदर्भभर पसरलेल्या अवैध रेती तस्करीविरोधात नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार मोहम्मद इनाजुल उर्फ ‘कल्लू खान’ याच्या ९ जणांच्या टोळीवर मकोका (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन कठोर पावले उचलली आहेत.

तपासात उघड झाले की, ही संपूर्ण तस्करी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून चालवली जात होती. विविध ठिकाणी रेतीची अवैध वाहतूक, पोलिस हालचालींची माहिती आणि व्यवहारांचे नियोजन या ग्रुपद्वारे करण्यात येत होते.

२४ एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण क्राईम ब्रँचने भंडारा जिल्ह्यातील पवनी परिसरात सापळा रचत टिप्पर (MH-49/BZ-1717) चालक कैसर अली रियाजुद्दीन अली याला बनावट रॉयल्टी पावत्यांच्या आधारे रेती तस्करी करताना रंगेहात पकडले. यावेळी टिप्परला स्कॉर्ट करणाऱ्या कारमधील (MH-49/CD-4577) कल्लू खानलाही अटक करण्यात आली.

या दोघांकडून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुडेगाव (जि. भंडारा) येथील सूरज दिलीप गभने (२७) आणि डोंगरगाव (ता. कुही) येथील दिनेश मधुकर यांनाही अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

या कारवाईमुळे विदर्भातील रेती माफियावर मोठा आघात मानला जात असून, पोलिसांकडून या रॅकेटमधील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.