Published On : Wed, Mar 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मोठी कारवाई; पाच गुन्ह्यांतील फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात!

Advertisement

नागपूर : शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ०३ ने मोठी कारवाई करत पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या आरोपीला अटक केली आहे. वसीम उर्फ ‘चिऱ्या’ अफजल शेख (वय ४७, रा. शांतीनगर, नागपूर) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीविरुद्ध यशोधरानगर, नागपुरी गेट (अमरावती), शांतीनगर, कळमना आणि लकडगंज पोलीस ठाण्यांमध्ये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये अमली पदार्थ (NDPS) कायद्यासह मारहाण, जीवघेणा हल्ला, धमकी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे.

Gold Rate
Apr 18 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,200 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,59,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी जुनी मंगळवारी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या कारवाईत गुन्हे शाखेच्या सायबर युनिटचे विशेष सहकार्य लाभले. आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement