नागपूर: रामटेक तहसीलमध्ये अवैध रेती तस्करीविरोधात प्रशासनाने कठोर पावती घेत मोठी कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संयुक्त कारवाईत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 1 कोटी 77 लाखांहून अधिक किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक पोलीस आणि अरोली पोलीस यांच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली. रामटेक-तुमसर मार्ग, नागपूर-जबलपूर रोड आणि खात-घोटमुंढरी रोडवर रेती तस्करीची माहिती मिळाल्यानंतर छापेमारी करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ऋषी वैरागडे, शुभम रडके, शिवशंकर कुमार, निकेश पारखी, अशफाक युसुफ खान, साकिब रझा खान, आशीष प्रकाश कनपटे, किशोर चकोले आणि अनिल राऊत यांचा समावेश आहे. या सर्वांवर महसूल विभाग आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.