Published On : Sat, May 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मोठा अपघात:प्रेस क्लब चौकात बेकाबू पोलिस व्हॅनचा धुमाकूळ!

Advertisement

नागपूर : शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील प्रेस क्लब चौकात काल उशिरा रात्री भीषण अपघात घडला. एका पोलिस व्हॅनने अचानक नियंत्रण गमावल्याने सिग्नलवर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित व्हॅन वेगात होती आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकामागून एक अनेक वाहनांना धडक बसली. या अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमींची नोंद झालेली नाही.

Gold Rate
May 02- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,800 /-
Gold 22 KT ₹ 1,40,200 /-
Silver/Kg ₹ 2,51,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालकाची निष्काळजीपणा की वाहनातील तांत्रिक बिघाड यामुळे हा प्रकार घडला, याचा तपास सुरू आहे. घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनाच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.

या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था आणि सरकारी वाहनांच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement