Published On : Fri, Jan 4th, 2019

बिनाकी (महेंद्र नगर) जलकुंभ स्वच्छता ६ जानेवारी ला

नागपूर: शहराला स्वच्छ, सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या वचनाला अनुसरत मनपा-OCWने ह्यावर्षी सुद्धा जलकुंभ स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. बिनाकी (महेंद्र नगर ) जलकुंभाची स्वच्छता ६ जानेवारी २०१९ रोजी करण्यात येत आहे.

बिनाकी जलकुंभाची स्वच्छता बाधित राहणारे भाग : आदर्श नगर, पंचकुवा, नयी बस्ती, महेंद्र नगर , खंते नगर, याश्दीप कॉलोनी, पंचशील नगर, सुजाता नगर, बाबू पाटील वाडी , महर्षी दयानंद नगर , बाबा बुद्ध नगर, संबोधि कॉलोनी , वैशाली नगर , हनुमान सोसायती , फारूक नगर , हबीब नगर , राणी दुर्गावती नगर .

मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील शक्य होणार नाही.