रामटेक: रामटेक नगर परिषदेच्या पायाभूत सुविधा अंतर्गत येणाऱ्या २ कोटी च्या विविध विकास कामाचे भूमिपूजन नुकतेच लकडगंज परिसर सुपर मार्केट येथे पार पडले या भूमिपूजन संभारभाला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, नगराध्यक्ष दिलीप देशमुख,बाजार समिती चे सभापती अनिल कोल्हे, माजी बाजार समिती सभापती बालचंद बादुले, भाजप शहर अध्यक्ष आनंदराव चोपकर, सत्तापक्ष नेता आलोक मानकर, बांधकाम सभापती लता कामळे, शिक्षण सभापती उज्वला धमगाये, नगरसेवक संजय बिसमोगरे, रामानंद अडामे, दामोधर धोपटे, विवेक तोतडे ; शिल्पा रणदिवे, वनमाला चौरागडे व रामटेक नगरीतील व्यापारी बंधु, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. विकास कामाकरिता सतत शासनदरबारी पाठपुरावा करून 2 कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचा रामटेक वासीयांनी सत्कार केला आभार मानले.

