Published On : Thu, Feb 15th, 2018

रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग आणि फॉर्च्यून फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारीपासून आयोजित युथ एम्पॉवरमेंट समीट-२०१८ रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन गुरूवार (ता.१५) देशपांडे सभागृहाच्या मैदानावर नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार प्रा.अनिल सोले व महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, फॉर्च्यून फाऊंडेशनचे कुणाल पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते,

Advertisement

नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि फॉर्च्यून फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २४ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन देशपांडे सभागृहात करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध कंपन्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी सहभागी होतील. भूमिपूजन कार्यक्रमाला धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेवक दीपक चौधरी, भाजपाचे संघटन मंत्री भोजराज डुंबे, कीर्तीदा अजमेरा, प्रशांत कामडे, गणेश चार्लेवार उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement