Published On : Sat, Aug 19th, 2017

भोसले घराण्यातील जेष्ठ सुपुत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे निधन

भोसले घराण्यातील माजी खासदार तेजसिंगराव राजे भोसले यांचे जेष्ठ सुपुत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे निधन यांचे आज दि.१९ ऑगस्ट दु.३.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले.मृत्यूसमयी ते ५१ वर्षा चे होते.

यांच्या पश्याचत पत्नी इंदिरा राजे भोसले,दोन मुली(अग्रेजा राजे भोसले,सयूंक्ता राजे भोसले),दोन बहिणी,एक भाऊ, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.ते शहरातील प्रसिद्ध उद्योजक होते.नागपूर च्या मॉस्कोट होंडा कंपनी चे मालक होते.

उद्या राविवार दि.२० ऑगस्ट रोजी २ वाजता भोसले राजवाडा, महाल अंत्ययात्रा येथून निघणार आहे.लक्ष्मणसिंग राजे भोसले यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार काशीबाई राजघाट,नवी शुक्रवारी येथे होणार आहे.

राजे लक्ष्मणसिंग भोसले माजी खासदार राजे तेजसिंग भोसले व माजी खासदार चित्रलेखताई भोसले यांचे जेष्ठ चिरंजीव आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे जावई होते.