पवनी (भंडारा)। जागतिक व्याघ्र दिन २९ जुलै रोजी सर्वत्र साजरा केला जातो त्या निमित्याने उमरेड- कऱ्हाडला वन्यजीव अभयारण्य वन्यजीव कार्यालय पवनी तर्फे शालेय विद्यार्थ्यां करीता चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केली होती. जंगल- नदीची माता व माझा आवडता प्राणी या विषयावर आधारित ह्या स्पर्धामध्ये वैनगंगा व पवन विद्यालय पवनी चे विद्यार्थी सहभागी झाले, वैनगंगा विद्यालयाच्या अंकिता वैरागडे , वैभवी भिवनकर , कुकडे , सोनाली राउत , तर पवन विद्यालयाच्या मनीषा बागडे ,जयश्री कुर्झेकर, मयुरी तिघरे, शरयू बोरकर, मोहिनी नागपूरकर, मृणाल नागलवाडे , मयुरी सावरबांधे, हर्ष सुखदेवे इत्यादी विद्यार्थ्याना नवेगाव- उमरेड येथील वन विभागाच्या विश्राम गृहात आयोजित एका कार्यक्रमात स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
वन्यप्राण्यांचा अधिवास व जंगलातील विविध वनस्पती, पक्षी इत्यादींची माहिती व्हावी म्हणून विद्यार्थ्यांकरीता जंगल भ्रमंती चे आयोजन करण्यात आले ह्या प्रसंगी पवनी वन्यजीव प्रकल्पाचे अधिकारी व्ही. जे. गायकवाड यांनी विद्यार्थ्याना व शिक्षकांना वनक्षेत्रात प्राणी व पक्ष्यांकारीता केलेया उपाय योजनांची माहिती दिली. वन कर्मचारी व वनपाल यांनी बांधलेल्या बांबूच्या मचाणी,सौर उर्जेवर आधारित उपकरणाद्वारे वन्य प्राण्याकरीता केलेली पाण्याची सोय, वनकुटी, विविध तलाव, व जलसाठे इत्यादी बाबींची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली . जंगल भ्रमंती दरम्यान हरीण, काळवीट, नीलगाय, बायसन , मोर, लांडोर इत्यादी प्राणी व पक्षी विद्यार्थ्यांनी पाहिले. ज्या जंगलात वारुळ संख्या जास्त ते जंगल समृद्ध ह्याचा प्रत्यय विद्यार्थ्यांना भ्रमंती दरम्यान आला.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY






