Published On : Tue, May 29th, 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक, अंतिम मतदान ५३.१५ टक्के

Advertisement

Voting
भंडारा: भंडारा – गोंदिया लोकसभा पोटनिवडणूूकीसाठी काल २८ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदानाची अंतिम टक्केवारी आज २९ मे रोजी प्राप्त झाली आहे. सकाळी ७ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत  ५३.१५  टक्के मतदान झाले आहे. यामध्ये ५४.११ टक्के पुरूष मतदार तर ५२.१७  टक्के महिला मतदारांचा समावेश आहे.

तुमसर विधानसभा क्षेत्रात ५७.३८ टक्के, भंडारा विधानसभा क्षेत्रात ४५.९०  टक्के, साकोली विधानसभा क्षेत्रात ६०.३३  टक्के, अर्जूनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात ५७.९४  टक्के, तिरोडा विधानसभा क्षेत्रात ५५.२७  टक्के, गोंदिया विधानसभा क्षेत्रात ४४.८७  टक्के मतदान झाले आहे.

सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही मतदान केंद्रावरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. केवळ पाच अभियंत्यांच्या भरवशावर दोन्ही जिल्ह्यातील मतदान केंद्रांचा भार असल्यामुळे चांगलीच धावपळ झाली होती. मात्र कोणत्याही मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली होती.  १८ उमेदवारांचे भाग्य मशिनबंद झाले आहे. आता मतमोजणीकडे लक्ष लागले असून सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.