Published On : Thu, May 31st, 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादी पुढे

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे 28 मे रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं.

LIVE : तिसऱ्या फेरीमध्ये राष्ट्रवादी 1000 मतांनी पुढे गेल्याची माहिती

Advertisement

LIVE : तिसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण, मात्र प्रशासनाकडून कोणत्याही आकडेवारीची घोषणा नाही

Advertisement

LIVE : तुमसर वगळता इतर पाचही विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपच्या हेमंत पटले यांना आघाडी

LIVE : तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे पुढे

LIVE : पोस्टल मतांमध्ये भाजप पुढे

LIVE : मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतांची मोजणी सुरु

नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पटोलेंनी 12 डिसेंबर 2017 रोजी दिलेला राजीनामा 14 डिसेंबर 2017 रोजी मंजूर झाल्यावर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.

गोंदिया-भंडारा पोटनिवडणुकीत मतदानावेळी झालेला अक्षम्य घोळ, त्यानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, फेरमतदान, जिल्हाधिकाऱ्यांची उचलबांगडी यामुळे पोटनिवडणुकीची चुरस कमालीची वाढली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement