Published On : Sat, May 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बंगालची चव; शेफ विष्णू मनोहर यांचा ‘झालमुडी महोत्सव’ ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

Advertisement

नागपूर : बंगालच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची झलक आता नागपूरकरांना चाखायला मिळत आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून नागपुरात “झालमुडी महोत्सव” आयोजित करण्यात आला असून “विष्णू की रसोई” येथे या चटपटीत पदार्थाची खास मेजवानी दिली जात आहे.

या महोत्सवात बंगालची लोकप्रिय स्ट्रीट फूड डिश झालमुडी विविध आधुनिक फ्लेवर्समध्ये सादर करण्यात आली आहे. तिखट, चटपटीत आणि वेगवेगळ्या मसाल्यांच्या मिश्रणाने तयार केलेल्या या पदार्थाला नागपूरकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले की, झालमुडीसाठी वापरण्यात आलेला मुरमुरा आणि काही खास मसाले थेट पश्चिम बंगालमधून आणण्यात आले आहेत. तसेच सुमारे दीड ते दोन हजार लोकांना या महोत्सवात झालमुडीचा आस्वाद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले की, “झालमुडी ही केवळ चविष्टच नाही तर त्यामध्ये पोषणमूल्येही आहेत. योग्य प्रमाणात घटक वापरल्यास एक प्लेट झालमुडी संपूर्ण स्नॅक म्हणून उपयुक्त ठरू शकते.”

Advertisement

नागपुरात आयोजित या आगळ्यावेगळ्या महोत्सवामुळे बंगालच्या खाद्यसंस्कृतीची चव शहरात अनुभवायला मिळत असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.