Published On : Sat, May 8th, 2021

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सादर करावे लागणार हयात प्रमाणपत्र – हिंगे

कामठी :-संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र 30 जून या कालावधीत कामठी तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र सादर करावे या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे जुलै महिन्यापासून अर्थसहायय बंद करण्यात येईल अशी माहिती तहसिलदार अरविंद हिंगे यांनो दिले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहायय विभाग यांचे शासन निर्णय 20 ऑगस्ट 2019 तसेच सामाजिक न्याय व विशेष सहायय विभाग यांच्या शासन निर्णय 3 मे 2021 नुसार कामठी तहसील कार्यालयास संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ योजना च्या अनुषंगाने कामठी तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत हयात असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.या कालावंधित प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे जुलैपासून अर्थसहायय बंद करण्यात येईल.

अर्थसहायय योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी हयात असंल्याबाबत प्रमाणपत्र, आधारकार्ड, तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असल्यास सध्याच्या कालावधीतिल सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र, परिशिष्ट 10 मधील तहसिलदार यांचेकडील उत्पन्न प्रमानपत्रासह संबंधित तलाठी याच्यामार्फत सादर करण्यात यावे तसे न केल्यास जुलैपासून संबंधितांचे अर्थसहायय बंद करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार अरविंद हिंगे यांनो दिली आहे.