Published On : Tue, Mar 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

बेलतरोडीतील प्लॉट घोटाळा उघड; पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर करून 3.81 कोटींची फसवणूक

Advertisement

नागपूर : बेलतरोडी परिसरात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार समोर आला असून, पॉवर ऑफ अटर्नीचा गैरफायदा घेत तिघा भावंडांनी प्लॉटची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात 3 कोटी 81 लाख रुपयांची फसवणूक झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रामनाकर, मधुकर आणि श्रीनिवास कोरपाटी (रा. भेंडाळा, ता. मौदा) अशी आरोपींची नावे असून ते तिघे सख्खे भाऊ आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा वरोडा येथील संबंधित जमीन जयस्वाल यांच्या नावावर आहे. महसुली नोंदी (7/12 उतारा) दुरुस्त करण्यासाठी त्यांनी कोरपाटी भावंडांना पॉवर ऑफ अटर्नी दिली होती. मात्र, या अधिकाराचा गैरवापर करून आरोपींनी मूळ मालकाच्या परवानगीशिवाय तोच प्लॉट चार वेगवेगळ्या खरेदीदारांना विकल्याचा गंभीर आरोप आहे.

या व्यवहारातून कोट्यवधींची रक्कम उभी करण्यात आली असून, एकूण 3.81 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात येताच जयस्वाल यांनी आरोपींकडे जाब विचारला आणि त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

बेलतरोडी पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.