नागपूर : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी १० मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.मात्र लाडकी बहीण योजनेसंदर्भात महायुती सरकारने महिलांची दिशाभूल केल्याचे पाहायला मिळाले.
सत्ताधारी महायुती आघाडीने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात वाढीचे आश्वासन दिले होते.
डिसेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आश्वासन दिले होते की त्यांचे सरकार या अर्थसंकल्पात देयके वाढवण्याचा विचार करेल. अर्थसंकल्पातून १५०० रुपयांवरून २१०० रुपये भत्ता वाढ वगळण्यात आला. त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींची दिशाभूल केल्याचे दिसत आहे. तसच विरोधकांनीही यावरून सरकारला धारेवर धरले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी ३३ हजार दोन कोटी रुपये खर्च झाला आहे.
सन २०२५-२०६ मध्ये या योजनेकरीता एकूण ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केले. दादा, २१०० रुपये कधीपासून देणार असे विचारले असता अजित पवार म्हणाले जरा थांबा असे म्हणत त्यांनी यावर भाष्य करणे टाळले.