Published On : Thu, Jun 11th, 2020

कोरोनाच्या काळात मोबाईल व संगणकाच्या माध्यमातून मधमाशी दिनाचे कार्यक्रम

कोविड 19 सिनारियो इन इंडिया या विषयावर राष्ट्रीय ई- परिसंवाद चे आयोजन

रामटेक – जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने नुकतेच खादी आणि ग्रामोद्योग आयोग, विभागीय कार्यालय नागपूर पद्दत्युदर विभाग ( प्राणी शास्त्र ), रेशीम आणि जैविक कीड नियंत्रण विभाग , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, ताई गोळवलकर विज्ञान महाविद्यालय रामटेक जिल्हा नागपूर, साईबाबा कला आणि विज्ञान पारशीवणी जिल्हा नागपूर, आणि विज्ञान महाविद्यालय पवनी जिल्हा भंडारा, यांच्या संयुक्त विद्यमाने बायोप्रस्पेकटिंग इन एपिकलचर : पोस्ट कोविड 19 सिनारियो इन इंडिया या विषयावर राष्ट्रीय ई- परिसंवाद चे आयोजन करण्यात आले होते.

या परिसंवादा मधे डॉ सुरेश कुमार रैना. आंतरराष्ट्रीय सल्लागार राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांचे पोस्ट “कोव्हीड सिनिरियो इन लाइवहूड ऑफ ट्रायबल्स अड्ड फार्मर्स इन विदर्भ थ्रू विकिपिंग” या विषयावर अत्यंत अभ्यास पूर्ण व्याख्यायान झाले. ज्या मध्ये त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना मधमाशी पालन क्षेत्रात उपलब्ध संधी चे महत्व पटवून दिले. परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रामध्ये निर्देशक ग्राम ऊद्योग नागपूर डॉ सी.पी कापसे यांनी खादी ग्रामोद्योग अंतर्गत मधमाशी पालन च्या विविध योजना या विषयावर व्याख्यान दिले. त्यामध्ये त्यांनी भारत सरकार द्वारा राबविण्यात येणाऱ्या मधमाशी पालन योजना आणि त्याबद्दल मिळणारे अर्थसाह्य या विषयावर प्रकाश टाकला.

या परिसंवादामध्ये 700 पेक्षा जास्त लोकांनी मोबाईल आणि संगणक वर गो टू मीटिंग अॅप च्या माध्यमातून सहभाग घेतला. परिसंवादाच्या सुरुवातीला प्रा.बी यस रहिले यांनी प्रास्ताविक पर भाषण दिले.

परिसंवादाचे संचालन प्रा. विजय राऊत तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत इंगळे यांनी केले.

परिसंवाद यशस्वी करण्यासाठी रा.तू .म नागपूर विद्यापीठा चे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर , डॉ सुरेश झाडे विभाग प्रमुख पदव्युत्तर विभाग (प्राणी शाखा),
रा. तू . म नागपूर विद्यापीठ,
डॉ मनोज राय , संचालक रेशीम आणि जैविक कीड नियंत्रण विभाग रा.तू. म विद्यापीठ नागपूर,
डॉ राजेश सिंगरू प्राचार्य ताई गोळवलकर महाविद्यालय रामटेक,
डॉ कुणाल डोमकी , साईबाबा कला व विज्ञान महाविद्यालय पारशिवनि , आणि विजय लेपसे प्राचार्य विज्ञान महाविद्यालय पवनी जिल्हा भंडारा यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.