पुणे: संसदेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले.मात्र वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी विरोध करत संसदेत गोंधळ घातला.पुण्यात पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातही वक्फचा घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
महाराष्ट्रात मागच्या काळात वक्फचा घोटाळा झाला.
वक्फच्या जमिनी या कोणी लाटल्या आणि त्यात काँग्रेसचे कोणते नेते होते हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे आणि त्याचा अहवाल देखील समोर आला आहे. यांना वक्फशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त जमिनीशी देणेघेणे आहे.
त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे. जे विधेयक आले आहे त्यामुळे पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे जमिनी लाटणाऱ्या लोकांवर टाच पडणार होती,म्हणूनच त्यांनी त्याचा विरोध केला,असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.