Published On : Thu, Oct 10th, 2019

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनो दक्ष राहा – रवींद्र ठाकरे

Advertisement

नागपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरु असून, निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक प्रयत्न करावेत. पुढील काही दिवस अत्यंत जबाबदारीने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्यात.

बचत भवन सभागृहात निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, पोलिस अधीक्षक राकेश ओला, निवडणूक खर्च निरीक्षक सुब्राज्योती चक्रवर्ती, गौतम पात्रा, दुर्गविजय सिंह, प्रसन्था एन., जयसिंह, चंद्रप्रकाश वर्मा, राजेश शर्मा, सुरेश चंद्र, शशी भूषण, प्रतिक कुमार सिंह आणि ऐलानचेझीएन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा हे उपस्थित होते.

यावेळी निवडणूक खर्च निरीक्षकांनी नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेतला. तसेच संबंधित नोडल अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.

जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ, एकूण लोकसंख्या, जिल्ह्यातील मतदारांची संख्या, लोकसभेवेळी आणि त्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष मतदार नोंदणी जनजागृती अभियानानंतर झालेल्या मतदारांच्या संख्येतील वाढ याबद्दल माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेत सहभागी विविध नोडल अधिकारी, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, स्वीप कार्यक्रम, भरारी पथके, पोलिस विभागाच्या आंतरराज्यीय आणि जिल्हास्तरीय समन्वयाच्या पार पडलेल्या आढावा बैठका आदींची माहिती दिली. तसेच जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी राबविलेले विशेष अभियान, निवडणूक यंत्रणेने केलेली पूर्वतयारी, निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण याबाबतची माहिती निवडणूक निरीक्षकांना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

यावेळी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नागपूर जिल्ह्यात ग्रामीण सहा विधानसभा मतदारसंघात पोलिस यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या विशेष प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील आंतरराज्यीय तपासणी नाके, मद्यविक्री, रोख रकम यांची होणारी वाहतूक आदीबाबत पोलिस यंत्रणेने केलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.

सायबर सेलच्या नोडल अधिकारी उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामांची माहिती आणि आता विधानसभा निवडणुकीत सायबर सेलकडून केली जाणारी प्रक्रिया याबाबतची माहिती दिली. तसेच सी-व्हीजील ॲपवर मतदारांकडून येणाऱ्या तक्रारी, त्यावरील होत असलेली दैनंदिन कार्यवाही याबाबतची माहिती दिली. तसेच निवडणुका निर्भय आणि मुक्त तसेच पारदर्शी वातावरणात पार पाडाव्यात यासाठी शहर पोलिस यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.

यावेळी जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून करण्यात येत असलेल्या मजकुराचे प्रमाणीकरण आणि पेड न्यूज तसेच सायबर सेलकडून येणाऱ्या तक्रारींच्या कामाची माहितीही नोडल अधिकारी अनिल गडेकर यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली.

मतदार यादी

दिनांक 4.10.2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीचा तपशिल