Published On : Wed, Aug 12th, 2020

कामठी पंचायत समितीचे बीडीओ सचिन सूर्यवंशी यांची बदली

कामठी :-नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कामठी पंचायत समिती चे बिडीओ सचिन सूर्यवंशी यांची अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कोपरगाव पंचायत समिती ला गटविकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली तर यांच्या रिक्त ठिकाणी आजूनपावेतो दुसऱ्या कुण्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली नाही हे

इथं विशेष!मात्र सध्याच्या स्थितीत या कोरोना महामारीच्या लढ्यात कोरोना नियंत्रणात आणण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली होणे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल तर या बदलीमुळे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांच्या शुभचिंतकात मात्र नाराजगीचे वातावरण पसरले आहे

संदीप कांबळे कामठी