Published On : Thu, Feb 24th, 2022
By Nagpur Today Nagpur News

आ. बावनकुळेंच्या नेतृत्वात ५ हजार युवा वॉरियर्स सांभाळणार योगीजींच्या प्रचाराची धुरा

Advertisement

गोरखपूर / नागपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघाची निवडणूक ३ मार्चला होत आहे.

या निवडणुकीची जबाबदारी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वात गोरखपूरचे ५ हजार युवा वॉरियर्स मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहे. 

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुक्काम सध्या गोरखपूरमध्ये असून, येथील  प्रचाराची सूत्र त्यांनी हाती घेतली आहेत. तब्बल १५० बैठकांचे नियोजन, १० हजार भाजपाच्या कार्यकर्त्यांच्य्या माध्यमातून ५ लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आ. बावनकुळेंनी पूर्ण केले आहे.

महत्वाचे म्हणजे संपूर्ण देशाचे लक्ष या मतदार संघाकडे असल्याने ५ हजार सक्रिय तरुणांच्या माध्यमातून विजयाचे लक्ष पूर्ण करायचे असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.     

Advertisement

गोरखपूरच्या जबाबदारी विषयी काय म्हणाले आ. चंद्रशेखर बावनकुळे  

प्रथमतः त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला योगीजींच्या मतदार संघाची जबाबदारी मिळते ही भाग्याची गोष्ट आहे. 

राष्ट्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राच्या बाहेर आणि ते पण योगी आदित्यनाथ जी यांच्या मतदार संघासाठी प्रभारी म्हणून निवड केली. याचा आनंद असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.