Published On : Fri, Apr 2nd, 2021

निराधार, वृद्धापकाळ,दिव्यांगांना अनुदान योजना

नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप


कामठी प्रतिनिधी २एप्रिल-निराधार, वृद्धापकाळ व अपंगांना अनुदान योजनांचा लाभ मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यापूर्वी तहसील कार्यालयात प्रकरणे जमा केली व प्रकरणे मंजूर व्हावीत यासाठी नगरसेविका संध्या रायबोले यांनी पाठपुरावा केला नियमानुसार मंजुर प्रकरणाची मंजुरीपत्राचे वितरण नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले

प्रभाग 15 शिवनगर येथील दयावती हेमराज लांजेवार,आनंद नगर येथील सुमन लखन यादव,रामगढ येथील सारिका महेंद्र चिमणकर,साईत्रा जोशी जगणे,आणि आंनद नगरातील सुशिला सुनील हजारे,प्रफुल गणेश ऊके दिव्यांग या लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे पत्र देण्यात आले

Advertisement

मंजुरी पत्र वाटप प्रसंगी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले आणि विक्की बोंबले,अजित सोनकुसरे,सेवाराम टंडन,अरुण पौणिकर,बादल कठाणे,दिनेश खेडकर, पंकज गजभिये,प्रज्वल सोलंकी,जागेश्वर गोंडाणे,विरेंद्र राऊत,हरिवंश मिश्रा,अभिषेक कनोजे, संजय पटले,मुकेश मालाधारी,भारती कनोजे,सविता टेकाम,प्रतिभा मेश्राम,अलका गोंडाणे,जयमनी सोनानी,प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

गोरगरिबांना शासनाच्या विविध अनुदान योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून योजनांचे लाभ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन नगरसेविका संध्या रायबोले यांनी यावेळी केले. शासकीय अनुदान मंजुरी पत्र मिळालेल्या लाभार्थ्यांनी नगरसेविका संध्या रायबोले यांचे आभार मानले

संदीप कांबळे

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement