Published On : Thu, Apr 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच, सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य

Advertisement

बारामती : राज्यातील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले. मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, “सुनेत्रा पवार या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या, तर आम्हाला आनंदच होईल,” असे स्पष्ट वक्तव्य केले.

माजी आमदार अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून, त्यांच्या जागी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. त्यांना अपक्ष उमेदवारांचेही आव्हान असले तरी विजयाबाबत पक्षात आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मतदानानंतर बोलताना सुप्रिया सुळे यांनी लोकशाही प्रक्रियेत मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. शरद पवार हे वैद्यकीय कारणांमुळे मतदानासाठी येऊ शकले नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

कुटुंबासाठी हा भावनिक काळ असल्याचे सांगत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. पक्षातील सर्व घटक त्यांच्यासोबत असून मोठ्या फरकाने त्या विजयी होतील, असे त्यांनी नमूद केले.

Advertisement

दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांना निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटिशीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, आरोप-प्रत्यारोपांचा सामना आम्ही पूर्वीही केला आहे, मात्र अन्याय झाला तरी नोटीस देण्याचा मार्ग अवलंबलेला नाही.

याचवेळी, विशेष न्यायालयाने रोहित पवार यांना राज्य सहकारी बँक प्रकरणातून दिलेल्या दिलाशावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सत्य कधीही पराभूत होत नाही, त्यामुळे त्यांना ‘क्लीन चिट’ मिळणे अपेक्षितच होते, असे त्या म्हणाल्या. तसेच, प्राजक्त तनपुरे यांनाही या प्रकरणात दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांच्या विधानाचा संदर्भ देत, सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर तो सर्वांसाठी आनंदाचा क्षण ठरेल.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges