Published On : Mon, Mar 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

ठाकरे गटाचे बाळराजे सांगत होते की…;देवेंद्र फडणवीसांचा कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरेंना टोला

Advertisement

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या कोस्टल रोडचे आज (११ मार्च) लोकार्पण करण्यात आले.या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर त्यांचे नाव न घेता टीका केली. “मला काल समाजमाध्यमावर बघायला मिळालं की उबाठाचे (शिवसेना, ठाकरे गट) बाळराजे सांगत होते की कोस्टल रोड आम्ही केला आणि आमच्या कामाचे श्रेय ते घेत आहेत.

Gold Rate
July 28 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,900 /-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,18,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पहिल्यांदा तर मी त्यांना सांगतो की, आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाहीत. जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो. या कोस्टल रोडची संकल्पना नवी नव्हती. मला आठवतं उद्धव ठाकरेंनी तर मुंबई महापालिकेच्या दोन निवडणुका या कोस्टल रोडचं प्रझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या. कोस्टल रोड मात्र कधी झालाच नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मी याआधी अनेक मुख्यमंत्र्यांना कोस्टल रोडसाठी दिल्लीला जाताना पाहिले.पण दिल्लीहून ते हात हालवत परत यायचे. केंद्राने त्यांना कोस्टल रोडसाठी परवानगी दिलीच नाही. केंद्रात मोदी आणि राज्यात महायुतीचे सरकार आलं. आम्ही कोस्टल रोड तयार करण्यासाठी परवानगी मिळवण्यास सुरुवात केली. मला आठवतं त्यासाठी केंद्र सरकारसोबत पाच बैठका झाल्या. प्रत्येक अडचणीवर आम्ही पर्याय काढू लागलो. सीआरझेडची लाईन बदलणार नाही, असं आम्ही केंद्राला सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. दरम्यान सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य नेते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
BJP के बाद शिवसेना सबसे बड़ा दल : उदय सामंत #UdaySamant #ShivSena #Politics #BJP #NDA #newsupdate

BJP के बाद शिवसेना सबसे बड़ा दल : उदय सामंत #UdaySamant #ShivSena...

भूमि अधिग्रहण के खिलाफ किसानों का पैदल मार्च #protest #Bhiwandi   #KisanAndolan #MaharashtraNews

भूमि अधिग्रहण के खिलाफ किसानों का पैदल मार्च #protest #Bhiwandi #KisanAndolan #MaharashtraNews

भिवंडी यातायात विभाग के ई-मेल आईडी बंद पड़े #maharashtranews #bhiwandi #maharashtra #newsupdates

भिवंडी यातायात विभाग के ई-मेल आईडी बंद पड़े #maharashtranews #bhiwandi #maharashtra #newsupdates

छह महीने बाद भी जांच अधूरी, युगेंद्र पयार नाराज #maharastranews #baramati #newsupdate #maharashtra

छह महीने बाद भी जांच अधूरी, युगेंद्र पयार नाराज #maharastranews #baramati #newsupdate...

नांदेड़ सहकारी बैंक चुनाव, मतगणना आज से शुरू #maharashtranews #nanded #maharashtra #newsupdate #news

नांदेड़ सहकारी बैंक चुनाव, मतगणना आज से शुरू #maharashtranews #nanded #maharashtra #newsupdate...

अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड

अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges